ACHARYA ABHISHEK

सिनेमॅटोग्राफ- सुरुवात

शंभर वर्षांच्या या इतिहासात ज्या श्रेष्ठ चित्रपटकत्त्यांनी सिनेमाला कलेचे स्थान मिळवून दिले, त्यांच्याशी जान पहचान करून देणारी लेखमालिका...

विसाव्या शतकाची सुरुवात झाली आणि जगभर या नव्या कलेबद्दल कुतहल निर्माण झाले. अनेक तंत्रज्ञांनी, कल्पक कलावंतांनी या क्षेत्रात प्रयोग करण्यास सुरुवात केली. या कलेच्या विकासाचा पहिला टप्पा प्रयोगाची लांबी वाढविणे हा होता. हळहळ पाच, दहा, पंधरा मिनिटांचे चित्रपट तयार होऊ लागले. सुरुवातीला काही दृश्यमालिकाच दाखविल्या जात. पुढे चित्रपटातन एक गोष्ट सांगावी, अशी कल्पना पुढे आली. गोष्ट सांगायची, तर त्यासाठी नवे तंत्र हवे. त्यामुळे चित्रपटाचे तंत्र विकसित झाले. संकलन या नव्या संकल्पनेने चित्रपटात पदार्पण केले. काळाच्या वेगवेगळ्या पातळ्यांना एकाच वेळी पडद्यावर आणता येऊ शकते, ही कल्पनाच मोठी युगप्रवर्तक होती. चित्रपटात प्रेक्षकाला क्षणात भूतकाळात, तर क्षणात वर्तमानकाळात आणता येऊ शकते, हे ध्यानात आले व या माध्यमाच्या शक्यता प्रचंड विस्तारल्या. हलत्या चित्रांच्या मालिकेत नावीन्य कसे आणता येईल, याचे प्रयोग सुरू झाले.

यापैकी पहिला लक्षवेधी प्रयोग जॉर्ज मेलिएने ‘ट्रिप टु द मून’ (१९०२) या चित्रपटाद्वारे केला. ज्यूल्स व्हर्नच्या कादंबरीतील कल्पनेवर हा चित्रपट आधारीत होता. अर्थात हा फक्त १४ मिनिटांचाच चित्रपट असल्यामुळे कथा अत्यंत थोडक्यात मांडण्यात आली होती. साहित्य आणि चित्रपट या दोन कलांच्या सहकार्याने भविष्यात जे अनेक असामान्य चित्रपट निर्माण झाले, त्या मालिकेची ही सुरुवात होती. हा सिनेमा जगातील पहिला ‘विज्ञानपट’ ठरला. वेगवेगळे आश्चर्यकारक ‘ट्रिक सीन्स’ हे या सिनेमाचे आणखी एक वैशिष्ट्य होते. शास्त्रज्ञ एका छोट्या रॉकेटमध्ये बसन चंद्रावर निघतात. त्यांना आपल्याकडे येताना पाहन मानवी चेहऱ्याचा चंद्र रागावलेला दिसतो. रॉकेट सरळ चंद्राच्या उजव्या डोळ्यात उतरते. डोळा खोबणीतून बाहेर येतो, असे त्यात दाखवले होते. चित्रपटाकडे वळण्यापूर्वी मेलिए हा व्यावसायिक जादगार होता. त्यामुळे त्याने सिनेमातही जाद आणली यात नवल नव्हते. त्याचे अनेक चित्रपट त्याची जादकला दाखविणारेच होते. त्याचा ‘द डेव्हिल्स मनोर’ हा जादुईपट जगातला पहिला रंगीत चित्रपट होता. खरे तर ऑक्टोबर १८९६ मध्ये रंगीत फिल्म नव्हतीच. परंतु या चित्रपटात रंग भरण्यासाठी मेलिएने चित्रपटाची प्रत्येक फेम हाताने रंगविली. मेलिएच्या डोक्यातून सतत काहीतरी भन्नाट कल्पना निघत व तो त्यांचा प्रयोग करून पाही.

एकदा एक अशीच मजेदार गोष्ट घडली. रस्त्यावर शूटिंग करताना मेलिएचा कॅमेरा बंद पडला. तो दुरुस्त करून त्याने पुढे शूटिंग सुरू केले. दुरुस्त करताना गफलतीमुळे काही नवी दृश्ये जुन्या दृश्यावर चित्रित झाली. फिल्म डेव्हलप करताना त्याला फार गमतीदार दृश्य दिसले. रस्त्यावरच्या बसची अचानक शववाहिनी झाली. पुरुषांच्या स्त्रिया झाल्या. चुकन झालेल्या या घटनेतून मेलिएने ‘ओव्हर प्रिंटिंग’चे तंत्र विकसित केले. मेलिएच्या कामगिरीमुळे त्याला ‘फादर ऑफ फिल्म फँटसी’ असे म्हटले जाते.
यानंतरचा दुसरा महत्त्वाचा दिग्दर्शक एडविन पोर्टर हा होय. चित्रपटकलेचे रूप पालटणारे मूलभूत प्रयोग पोर्टरने केले. दोन दृश्यांमध्ये एक दृश्य टाकून वेगळा अर्थ काढणे व त्याचा ससेन्ससाठी उपयोग करणे, हे तंत्र पोर्टरने शोधून काढले. एका सिनेमाचे चित्रीकरण करण्यासाठी त्याने प्रथमच एका उत्तुंग इमारतीवर कॅमेरा नेला. त्यामुळे त्याला खूप दरचा प्रदेश न्याहाळणे शक्य झाले. तेथूनच त्याने पहिला ‘पॅनिंग शॉट’ घेतला. या पद्धतीने त्याला भव्य अवकाश दाखविता आला.

चित्रपटाचे क्षितीज खरोखरच विस्तारले!

पोर्टरचा सर्वात महत्त्वाचा चित्रपट ‘द ग्रेट ट्रेन रॉबरी’ (१९०३) हा होता. १२ मिनिटांच्या या अॅक्शनपटात एका ट्रेनवर पडलेल्या दरोड्याची व दरोडेखोरांचा सामना करणाऱ्या शेरीफची चित्तथरारक कथा वेगवान पद्धतीने मांडली होती. एकाच वेळी अनेक वेगवेगळ्या ठिकाणी घडणाऱ्या घटनांची दृश्ये आलटून पालटून दाखवीत पोर्टरने ‘क्रॉस कटिंग’ या नव्या तंत्राचा प्रभावी वापर केला. चालत्या गाडीत कॅमेरा ठेवून त्याने प्रथमच चित्रीकरण केले. या चित्रपटात शेवटी एक पात्र कॅमेयाकडे नेम धरून बंदक उडविताना दाखविले आहे. त्याकाळी ही कल्पना एवढी अभिनव होती, की अनेक प्रेक्षक आपल्याला गोळी लागते की काय, या शंकेने भयभीत होत असत.

हळूहळू चित्रपट अधिकाधिक लोकप्रिय बन लागले. मात्र, या सुमारासच समाजातल्या एका वर्गाने या कलेवर टीका केली. चित्रपट ही मूलतः इतर कलांपेक्षा वेगळी अशी कला होती. कारण ती एक कला नसन, अनेक चित्रकला, फोटोग्राफी, संगीत, नृत्य, साहित्य, नाट्य अशा अनेक विकसित कलामधन सामर्थ्य घेऊन चित्रपटाने आपले स्वायत्त विश्व निर्माण केले. मात्र, या बाबीसाठीही चित्रपटावर टीका झाली. प्रख्यात लेखिका व्हर्जिनिया वूल्फने यासंदर्भात लिहिले- ‘एक फार विलक्षण गोष्ट घडली आहे. इतर साऱ्या कला जन्मतः विवस्त्र होत्या. मात्र, ही नवी कला (सिनेमा) पर्ण कपडे लेवनच जन्माला आली आहे. सांगण्यासारखे जवळ काही नसतानाच ती खुप काही सांगू पहाते आहे. एखाद्या रानटी जमातीला समुद्रकिनाऱ्यावर अनेक वाद्ये- फ्ल्यूट, पियानो, सेक्सोफोन वगैरे सापडावीत आणि संगीताचा गंध नसताना त्या माणसांनी ती बडवायला सुरू करावी, तसे झाले आहे.’ मात्र, या कलेचे सामर्थ्य ओळखणारे महान लेखकही होते. ‘सिनेमा गतिमानतेचे गढ, देवी वरदान मिळालेले माध्यम आहे,’ असे टॉलस्टॉयचे मत होते.

उण्यापुन्या शंभर वर्षांत आज या कलेने जो पल्ला गाठला आहे तो विस्मयकारक आहे. मुकपट ते बोलपट, कृष्णधवल ते रंगीत, १६ एम. एम. ते ७० एम. एम., साधा ध्वनिमुद्रित आवाज ते स्टीरिओफोनिक साऊंड अशी प्रगती करीत असताना सिनेमाने आशय व अभिव्यक्तीच्या पातळीवरही विलक्षण उंच झेप घेतली आहे. आता तर डिजिटल कॅमेऱ्याच्या तंत्रामुळे चित्रपटात क्रांतिकारी बदल होत आहेत. आज कवी जसे रस्त्यात भेटलेल्याला आपली कविता वाचून दाखवितात, तसे उद्या दिग्दर्शक भेटेल त्याला म्हणू शकतील, ‘थांब, तुला माझा सिनेमा दाखवितो.’

या प्रगतीचा आलेख आपण ५१ दिग्दर्शकांद्वारे पाहणार आहोत. “सिनेमॅटोग्राफ” नंतरच्या प्रवासाचा हा ‘ग्राफ’ आहे.

त्यात पहिला दिग्दर्शक असेल : डी. डब्ल्यू. ग्रिफिथ.

विजय पाडळकर