ACHARYA ABHISHEK

Satyajit Ray (सत्यजित राय)

`Not to have seen cinema of Satyajit Ray means existing in the world without seeing sun or moon.’ Akira Kurosawa (Japanese film director and screenwriter, regarded as one of the most important and influential filmmakers in the history of cinema)

Satyajit Ray

`Not to have seen cinema of Satyajit Ray means existing in the world without seeing sun or moon.’
Akira Kurosawa
(Japanese film director and screenwriter, regarded as one of the most important and influential filmmakers in the history of cinema)

रॉबर्टो रोसेलिनीच्या ‘फ्लावर्स ऑफ सेंट फ्रांसिस’ या चित्रपटात एक अप्रतिम प्रसंग आहे. सेंट फान्सिस हा धर्मगुरू परमेश्वराची प्रार्थना करीत असताना एक पक्षी येऊन मंजुळ आवाजात गाऊ लागतो, फान्सिरा त्याला म्हणतो, ‘थांब, गाऊ नकोस. मला प्रार्थनेवर लक्ष कौंद्रित करू दे. कारण ईश्वराशी संवाद करणे जरी तुला सोपे असले, तरी आम्हा मानवासाठी ती फार कठीण गोष्ट आहे.’

श्रेष्ठ कलावंतही असेच पक्ष्यांसारखे असतात. आपल्यासाठी जे कठीण असते, ते त्यांच्यासाठी सहज, सोपे, स्वाभाविक व नैसर्गिक असते. सत्यजित राय हे असेच एक महान कलावंत होते.

जागतिक चित्रपटांना अनेक दिग्दर्शकांनी श्रेष्ठ कलाकृतीचा दर्जा मिळवून  दिला. सत्यजित राय हे त्या दिग्दर्शकांचा मेरुमणी म्हणन शोभणारे व्यक्तिमत्त्व आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत तर त्यांचे स्थान अनन्यसाधारण आहेच. पण जागतिक चित्रपटसृष्टीचा विचार करतानाही त्यांचा अग्रक्रमाने उल्लेख करावा लागतो. श्रेष्ठ जपानी चित्रपट दिग्दर्शक अकिरा कुरोसावा यांनी सत्यजित राय यांच्या चित्रपटांसंदर्भात म्हटले आहे

Not to have seen cinema of satyajit ray means existing in the world without seeing sun or moon,’

सत्यजित राय यांचा जन्म १९२७ साली कलकत्त्यातील एका कलावंत घराण्यात झाला. त्यांचे आजोबा उपेद्रकमार राय हे लेखक व प्रकाशक होते. ते पियानो व व्हायोलिन वाजवीत, चित्रे काढीत, लहान मुलांसाठी कविता व  बडबड गीते लिहीत.

त्यांचे वडील सुकुमार राय हेदेखील लहान मुलांसाठी गीते लिहीत. त्यांची गीते अजुनही बंगालमध्ये लोकप्रिय आहेत.

सत्यजित राय यांची आई चांगली गायिका होती. मातीची शिल्पे तयार करण्याच्या कलेत तिला चांगली गती होती. सत्यजित दोन वर्षांचा असतानाच त्याचे वडील वारले. राय कुटुंबाचा रवींद्रनाथ टागोरांचा फार जवळचा संबंध होता. कलकता युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएट झाल्यावर चित्रकलेच्या शिक्षणासाठी सत्यजित शातिनिकेतनमध्ये गेले. तिथे काढलेली दोन अडीच वर्षे हा त्यांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा जडणघडणीचा काळ होता. या काळाचे वर्णन करताना त्यांनी लिहिले आहे- ‘मी  चित्रकला शिकत होतो आणि फावल्या वेळात वाचन करायचो… निसर्गाची ओळख करून घ्यायचो… माणसांचे निरीक्षण करायचो. जे पाहिले त्यावर चिंतन  करायचो, या  बिंदूपासून पुढे अनेक गोष्टीची सुरुवात झाली…

शांतिनिकेतनमध्ये ज्यांनी आम्हाला शिकविले ते केवळ प्राध्यापक नव्हते, ते महान कलाकार होते… त्यांना दृष्टी होती…जीवनाविषयीची खोल समज होती. या काळात मी भारतीय साहित्य वाचले. जगातील अभिजात  वांग्मयकृती वाचल्या. परंतु मी संगीतात फारसा रमलो नाही.”

तरुण सत्यजितचे व्यक्तिमत्त्व असे अनेक अंगांनी फूलत होते. या सुमारास त्यांच्या हाती विभूती भूषण बंदोपाध्याय  यांची ‘पाथेर पांचाली’ ही महान कादंबरी आली. या कादंबरीच्या लहान मुलांसाठीच्या आवृत्तीची  चित्रेही सत्यजितनी काढली.

सुप्रसिद्ध चित्रपट समीक्षक चिदानंद दासगुप्ता यांनी राय यांच्याबद्दल लिहिताना एक  महत्वाचे विधान केले होते. ते लिहितात,  “राय यांनी समकालीन   कलातील  सामर्थ्य व  मूल्यें चित्रपटांच्या माध्यमातून आणली.”

दिग्दर्शकाच्या व्यक्तिमत्वाला जितके अधिक पैलू असतील इतका त्याने निर्माण केलेला चित्रपट असे समृद्ध होत जातो. चिदानंद दासगुप्ता आणि काही समविचारी मित्रांना सोबत घेऊन सत्यजित राय  यांनी 1947 साली ‘कलकत्ता फिल्म सोसायटी’ ची स्थापना केली. या सोसायटीत जागतिक पातळीवरचे महत्वपूर्ण चित्रपट दाखविले जात व त्यावर चर्चा केली जाई. या काळातच सत्यजित राय यानी पटकथा लेखनाचा एक अभिनव प्रयोग करून पाहिला. एखाद्या साहित्यकृतीवर चित्रपट बनतो आहे, असे समजले  तें ती कलाकृती वाचून काढीत व तिच्यावर आधारित  पटकथा लिहून पहा नंतर त्या चित्रपटाशी ते आपली पटकथा ताडून पाहत. 

१९५० साली सत्यजितना कंपनीतर्फ पाच महिन्यांसाठी लंडनला पाठविण्यात आले. या पाच महिन्याच्या काळात सत्यजितनी  सुमारे शंभर चित्रपट पाहिले. जागतिक चित्रपट  क्षेत्रातील असामान्य दिग्दर्शकांची  व त्यांची ओळख येथेच झाली.  डिसिका, फ्लाहत्री

 अशा नामवंत चित्रपटांचा त्यांच्यावर खोल परिणाम झाला.  विशेषतः ‘बाइसिकल थीफ’ हा चित्रपट पाहिल्यानंतर आपणही सिनेमा तयार करायचाच, असा ठाम निश्चय सत्यजित केला.  भारतात परतल्यावर त्यांनी पाथेर पांचाली ही कादंबरी पुन्हा हाती घेऊन त्यावर पटकथा लिहिण्यास प्रारंभ केला. 

या पटकथेवर त्यांनी फार कसून काम केले. ती त्यांनी अनेकदा लिहिली एवढेच नव्हे तर प्रत्यक्ष चित्र ना पूर्वी संकल्पित दृश्यांची असंख्य रेखाटणे ही त्यांनी काढली होती. कॅमेराचे ऍंगल, प्रकाश योजना, पात्रांच्या हालचाली यांचे तपशीलही त्यांनी जागोजागी लिहून ठेवले होते. अशा प्रकारे चित्रपट सुरू करण्यापूर्वी कागदावर तो तयार ठेवण्याची पद्धत भारतात तरी सत्यजितनी प्रथम आणली. या चित्रपटासाठी भांडवल उभे करताना मात्र सत्यजितला फार त्रास झाला. दोन वेळा पैशाअभावी या चित्रपटाचे चित्रीकरण खोळंबून राहिले. शेवट बंगाल सरकारने काहीसे नियम डावलून या चित्रपटाला अर्थसहाय्य केले व तो पडद्यावर येऊ शकला.

या चित्रपटाच्या यशामुळे हुरुप येऊन सत्यजितनी १९५६ साली विभु तिभषणांच्याच ‘अपराजितो’ या कादंबरीवर आधारित त्याच नावाचा चित्रपट निर्माण केला. आई व मुलगा यांच्यातील नात्याचे उदात्तीकरण टाळन अत्यंत वास्तवदर्शी, सम्म व नाट्यपूर्ण चित्र रायनी या चित्रपटात केले होते. काही वर्षांनी- १९५९ मध्ये याच कायरीतील पुढील भागावर रायनी ‘अपूर संसार’ हा चित्रपट निर्माण केला. काही समीक्षकांच्या मते, हा त्यांचा सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे. या तिन्ही चित्रपटांना एकत्रितपणे ‘अपू त्रिवेणी’ असे म्हटले जाते. जागतिक चित्रपटांतील ही सर्वश्रेष्ठ अशी त्रिवेणी आहे. (या तीन चित्रपटांबदल मी माझ्या ‘नाय आहे चाललेली’ या पुस्तकात तपशीलवार पणे लिहिले आहे. कादंबरी आणि चित्रपट या दोन माध्यमांचा त्यात तुलनात्मक अभ्यास आहे.) या तीन चित्रपटांनी सत्यजित राय यांना दिगंत कीर्ती मिळवन दिली. येथूनच सत्यजित राय या नावाची एक अभिजात विधा निर्माण झाली. पुढे सुमारे छत्तीस वर्षे १९९२ साली मृत्यू येईपर्यंत सत्यजितनी सातत्याने वैशिष्ट्यपर्ण चित्रपटांची निर्मिती केली. त्यांनी जसे कालखंडपट निर्माण केले तसेच आधुनिक बंगालचे दर्शन घडविणारे, सामाजिक प्रश्न मांडणारे चित्रपटही निर्माण केले. विनोदी, हलकेफलके चित्रपट आणि गंभीर शोकात्मिकाही त्यांनी चित्रित केल्या. लहान मुलांसाठीही त्यांनी उत्तम करमणकप्रधान, मनोरंजक व आशयधन चित्रपट निर्माण केले. बालचित्रपटासारख्या दुर्लक्षित क्षेत्रातही त्यांनी आपला ठसा उमटविणारे कर्तृत्व करून दाखविले. ‘गोपी गाये बाघा बाये’, ‘सोनार केला’, ‘जय बाबा फेलनाथ’ गाणि ‘हिरोक राजार देशे’ हे त्यांचे चित्रपट म्हणजे कुमारांसाठी चित्रपट कसे बनवावेत, यांचा वस्तुपाठच आहेत. विशेष म्हणजे हे चित्रपट मोठ्यानाली तेवढेच आवडतात. सत्यजित राय यांच्या कलेचा हा फार मोठा चमत्कार आहे.

सत्यजित राय यांच्या चित्रपटांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी केलेले श्रेष्ठ साहित्यकृतींचे चित्रपटीकरण हे होय. सत्यजित उत्तम, साक्षी व जाणकार वाचक होते.

कथा-कादंबरीतले नेमके नाट्य त्यांच्या ध्यानी येत असे. म्हणनच त्यांचे सुमारे पंच्याहत्तर टक्के चित्रपट कुठल्या ना कुठल्या साहित्यकृतीवर आधारित आहेत, याचे आश्चर्य वाटत नाही. अभिजात साहित्याचे चित्रपटात रूपांतर एवढया मोठ्या प्रमाणात करणारा जगात दुसरा दिग्दर्शक नाही. ‘पराश पत्थर’ हा त्यांचा चित्रपट परशुराम यांच्या कथेवर आधारित होता, तर ‘जलसाघर’ हा ताराशंकर बंदोपाध्याय यांच्या कथेवर. सुरुवातीस उल्लेखिलेल्या त्रिवेणीशिवाय विभतीभषण यांच्या कादंबरीवर त्यांनी ‘अशनी संकेत’ हा चित्रपट काढला. देवी (प्रभात मुखर्जी), घरे बाइरे, तीन कन्या, चारुलता (रवींद्रनाथ टागोर), अभिजान (ताराशंकर), महानगर (नरेंद्रनाथ मित्र), कापुरुष ओ महापुरुष (प्रेमेंद्र मित्र), अरण्येर दिन रात्री व प्रतिद्वंद्वी (सुनील गांगुली), सीमाबद्ध व जनअरण्य (शंकर), शतरंज के खिलाडी (प्रेमचंद) हे त्यांचे गाजलेल्या साहित्यकृतींवर आधारित चित्रपट होत. त्यांचा ‘गणशत्रु’ हा चित्रपट देखील प्रसिद्ध नाटककार इब्सेनच्या ‘एनिमी ऑफ पीपल’वर आधारित होता. तर ‘गोपी गाये बाघा बाई ची कथा त्यांच्या आजोबांची होती.

सत्यजित राय यांचा सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता, यासंदर्भात रसिकांचे व समीक्षकांचे एकमत होणे अशक्य, एवढी विपुल व श्रेष्ठ निर्मिती त्यांनी केली आहे. खुद सत्यजितना त्यांचा ‘चारुलता’ हा चित्रपट सर्वाधिक प्रिय होता. (या चित्रपटाबद्दल तपशिलाने पुढील लेखात विचार केला जाईल.)

सत्यजित राय यांचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू होते. आपल्या चित्रपटाचे पटकथा लेखन, दिग्दर्शन, पोस्टर्स तयार करणे, या गोष्टी ते स्वतःच करीत. सुरुवातीला ‘अप त्रिवेणी’साठी त्यांनी रविशंकर यांच्याकडन पार्श्वसंगीत तयार करून घेतले होते. पण नंतर संगीताची बाजही त्यांनी स्वतःच सांभाळली. त्यांनी २८ दीर्घ चित्रपट आणि तीन लघुपट तयार केले. याशिवाय पाच अनुबोधपटही त्यांनी निर्माण केले. सुकुमार रॉय आणि रवींद्रनाथ टागोर यांच्यावरील सत्यजित राय यांचे अनुबोधपट हे या क्षेत्रातील त्यांच्या कौशल्याची साक्ष देणारे आहेत.

सत्यजित राय उत्तम लेखकही होते. त्यांनी ‘फेलदा’ या नावाने एक अफलातन व्यक्तिमत्त्व आपल्या कादंबऱ्यांतून निर्माण केले. हा एक अत्यंत बुद्धिमान असा डिटेक्टिव्ह आहे. हा माणस म्हणजे चालता-बोलता ज्ञानकोशच आहे. साहित्य, विविध कला, भाषाशास्त्र, विज्ञानाच्या विविध शाखा, इतिहास अशा अनेक गोष्टीत त्याला रस आहे व प्रचंड माहितीही आहे. त्याला प्रवासाची विलक्षण आवड आहे व आपल्या ज्ञानात सतत भर टाकण्याची इच्छाही आहे. राय यांनी फेलूदा च्या रूपाने जण स्वतःचे पोर्टेट रेखाटले आहे. या व्यक्तिरेखेला घेऊन त्यांनी ‘सोनार केला’ व ‘जय बाबा फेलनाथ हे चित्रपट तयार केले. डिटेक्टिव्ह कादंब्यांची सतरा पुस्तके, अनेक विज्ञान कथासंग्रह त्यांनी लिहिले. शिवाय त्यांनी केलेले चित्रपटविषयक लेखनही अत्यंत मौलिक आहे. ‘अवर फिल्मस, देअर फिल्म्स’ आणि ‘स्पीकिंग ऑफ फिल्म्स’ या पुस्तकांतन त्यांनी चित्रपटकलेबद्दल अत्यंत मलभत विवेचन केले आहे. तसेच आपल्या आयुष्यातील अनेक हृय आठवणीही त्यांनी सांगितल्या आहेत. ‘संदेश’ हे मुलांसाठीचे नियतकालिक त्यांच्या आजोबांनी सुरू केले होते. ते नंतर बंद पडले सत्यजितनी त्याचे पुनरुज्जीवन केले. त्यांनी अनेक पुस्तकांची रेखाटने, मुखपृष्ठेही केली. इतकेच नव्हे तर मुद्रणकलेच्या क्षेत्रात ‘राय रोमन’ व ‘राय विझार’ असे दोन नवे टाइप तयार केले.

सत्यजित रायनी एका नव्या प्रकारच्या चित्रपटाला जन्म दिला. हा चित्रपट वास्तववादी होता, पण कुठेही रटाळ, बोजड किंवा दुर्बोध नव्हता. जीवनातल्या प्रखर वास्तवाला त्यांनी काव्यात्मतेची आाणि स्वप्नांची जोड दिली. त्याचे सब्बदयतेने चित्रण केले.

वास्तववादाला विशाल, व्यापक मानवतावादी जोड दिली. भव्य आकाशाच्या पार्श्वभमीवर बगळ्यांची माळ सरकत जावी, त्याप्रमाणे त्यांच्या चित्रपटांत मानवी नातेसंबंधांतील सक्षम बारकावे येतात. त्यांनी अतिनाट्याचा वापर केला आहे, पण तोही अत्यंत संयमाने. ते हळुवार होतात, पण भावुक होत नाहीत. आपल्या पात्रांबदल त्यांच्या मनात अपार सहानुभती असते व तीच प्रेक्षकांच्या मनात त्यांचे चित्रपट पाहताना संक्रमित होते.यामुळेच कदाचित त्यांच्या चित्रपटांत संपर्ण खलपुरुषाचे चित्रण येत नाही.

१९४९ साली जीन रेनॉ भारतात आले असताना त्यांनी सत्यजितना एक सल्ला दिला होता… ‘चित्रपटातील कुठल्याही पात्राला दोषी ठरविण्याचा प्रयत्न करू नका. साऱ्या पात्रांवर सारखेच प्रेम करा. प्रत्येकाजवळ आपली कारणे असतात व दुःख सहन करणारा सहानुभतीचा प्रथम हक्कदार असतो.’ म्हणनच एक समीक्षक म्हणतो, ‘सत्यजितचे विश्व हे पापरहित विश्व आहे.’ सत्यजितना अनेक पुरस्कारांनी गौरविले गेले. त्यांना १९६७ साली मॅगसेसे अवार्ड मिळाले.

१९८५ साली दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. १९९२ साली त्यांना विशेष ऑस्कर देऊन गौरविण्यात आले. तर भारत सरकारने त्याच वर्षी त्यांना ‘भारतरत्न’ किताबही दिला.

जागतिक चित्रपटसृष्टीत अनेक महान दिग्दर्शक होऊन गेले. त्यांची क्रमवारी ठरविता येणे अवघड आहे व अशी यादी कधीच सर्वमान्य होऊ शकत नाही. सत्यजित राय यांचा आवाका, त्यांचे सामर्थ्य आणि त्यांनी निर्माण केलेले स्वायत्त विश्व यांच्याशी तुलना करता येणारा दुसरा दिग्दर्शक मला तरी कुणी दिसत नाही. मला तरी कुणी दिसत नाही.

विजय पाडळकर