ACHARYA ABHISHEK

लुइस माइलस्टोन – Lewis Milestone

कहाणी म्हणजे कुणावर दोषारोप नव्हे, कबुलीजबाब नव्हे, किंवा ही साहसकथा तर मुळीच नाही. कारण ज्यांना मृत्यूचे अस्तित्व समोर जाणवते त्यांच्यासाठी ते साहस नसते. ही अशा पिढीची कथा आहे, जी भले दारूगोळ्यापासून वाचली असेल, पण युद्धाने तिला उद्ध्वस्त करून टाकले होते...'

कहाणी म्हणजे कुणावर दोषारोप नव्हे, कबुलीजबाब नव्हे, किंवा ही साहसकथा तर मुळीच नाही. कारण ज्यांना मृत्यूचे अस्तित्व समोर जाणवते त्यांच्यासाठी ते साहस नसते. ही अशा पिढीची कथा आहे, जी भले दारूगोळ्यापासून वाचली असेल, पण युद्धाने तिला उद्ध्वस्त करून टाकले होते…’

‘ऑल क्वाएट ऑन द वेस्टर्न फ्रंट’ या चित्रपटाच्या सुरुवातीस पडद्यावर ही वाक्य येतात. युद्धाची भीषणता आणि त्याचे मानव जातीवर होणारे दुरगामी परिणाम यावर प्रभावी भाष्य करणारा हा चित्रपट जगातील सर्वोत्तम युद्धपटांपैकी एक मानला जातो. हा चित्रपट प्रदर्शित होऊन सुमारे ८० वर्षे होत आली, पण त्याचे जबरदस्त चित्रीकरण व त्यामागची मूलभूत आशयसूत्रे यामुळे तो अजूनही आवर्जून पाहिला जातो. काळ त्याला कोमेजुन टाकू शकलेला नाही.

Lewis-Milestone
Lewis Milestone

या चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे नाव लुइस माइलस्टोन हे होते. हा चित्रपट एरिक मारिया रेमार्क या लेखकाच्या जगद्विख्यात कादंबरीवर आधारित आहे. १९२९ साली रेमार्कची ‘ऑल क्वाएट ऑन द वेस्टर्न फ्रंट” ही कादंबरी प्रकाशित झाली आणि प्रचंड गाजली. प्रकाशनानंतर दोन वर्षांच्या आतच या कादंबरीची २५ भाषांत भाषांतरे होऊन तिच्या २५ लाखांहून अधिक प्रती खपल्या होत्या. १९२९ मध्येच या कादंबरीवर चित्रपट तयार करण्याची कल्पना युनायटेड पिक्चर्सच्या मनात आली व त्यांनी दिग्दर्शनासाठी लुइस माइलस्टोनला पाचारण केलं. लुइसचा जन्म १८९५ साली रशियात झाला. मात्र, पहिल्या महायुद्धापर्वीच तो रशिया सोडून अमेरिकेत वास्तव्यास आला होता. यू  एस. सिग्नल कॉर्पच्या आर्मी ट्रेनिंग फिल्म्सचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणन त्याने काही काळ काम पाहिले. इथे सैनिकांच्या जीवनाचे जवळून निरीक्षण करण्याची संधी त्याला मिळाली. १९१८ साली त्याने ‘द ट्थब्रश’ नावाचा मूकपट बनविला. त्याने १९२७ साली बनविलेल्या ‘टू अरेबियन नाइटस्’ या चित्रपटाला १९२९ साली ‘कॉमेडी फिल्म्स साठीचे ऑस्कर मिळाले.

असे असले तरी १९३० चा ‘ऑल क्वाएट…’ हा चित्रपट खऱ्या अर्थाने माइलस्टोनला जागतिक कीर्ती मिळवन देणारा ठरला. या चित्रपटाने ‘युद्धपट’ हे एक नवे दालन जागतिक सिनेमात उघडून दिले. माइलस्टोन हा खंदा वाचक होता. आपल्या चित्रपटासाठी कथा म्हणून त्याने अनेक साहित्यकृतींचा उपयोग करून घेतला आहे. श्रेष्ठ अमेरिकन कादंबरीकार जॉन स्टाइनबेक याच्या ‘ऑफ माइस अँड  मेन’ आणि ‘रेड पोनी’ या दोन कादंब्यांवर त्याने त्याच नावाचे दोन चित्रपट १९३९ व १९४९ साली तयार केले. ह्यूगोच्या ‘ला मिझराब्ल’ या कादंबरीवरही त्याने चित्रपट तयार केला होता. १९५० पासन त्याने चित्रपट निर्मितीतील आपला रस बराच कमी केला व तो टीव्ही सीरियल्सकडे वळला. ‘म्युटिनी ऑन द बाऊंटी’ (१९६२) हा नंतरच्या काळातील त्याचा एक गाजलेला चित्रपट. लुइस माइलस्टोन १९८० साली मरण पावला.

‘ऑल क्वाएट…’ या कादंबरीचा लेखक एरिक मारिया रेमार्क याचा जन्म १८९८ साली ओस्तंब्रुक (जर्मनी) येथे झाला.

वयाची १८ वर्षे पूर्ण होताच त्याला लष्करात जावे लागले. अत्यंत कोवळ्या वयात घरापासन, जिवलगांपासन दर, मृत्यच्या सान्निध्यात राहण्याचा जो भीषण अनुभव त्याने घेतला, त्यामुळे त्याचे भावविश्व बदलन गेले. १९१७ मध्ये पहिल्या महायुद्धात तो पश्चिम आघाडीवरील लढाईत सामील झाला होता. युद्धानंतर त्याने शिक्षक, लायब्रियन, पत्रकार अशी विविध कामे केली. आपल्या अनुभवांवर आधारित ‘ऑल क्चाएट…’ ही कादंबरी त्याने १९२९ साली प्रकाशित केली. त्याच्या आईचे नाव मारिया असे होते. तिच्या सन्मानार्थ त्याने आपले एरिक पॉल रेमार्क हे नाव बदलून एरिक मारिया रेमार्क असे केले. (याची भरपाई म्हणून की काय, वडिलांचे पॉल हे नाव त्याने आपल्या कादंबरीतील नायकाला दिले.) १९३३ साली जर्मनीत पुन्हा नाझींच्या तत्त्वज्ञानाचे वारे वाहू लागले. त्यावेळी नाझींनी रेमाच्या या पुस्तकावर बंदी घातली व त्याच्या उपलब्ध प्रती जाळन टाकल्या. याची चाहल लागल्यामुळे रेमाकने १९३१ सालीच स्वित्झर्लंडला स्थलांतर केले होते. १९३९ साली तो अमेरिकेत आला, पण तेथे त्याचे मन रमले नाही. १९४८ मध्ये तो स्वित्झर्लंडला गेल्यावर आपले उरलेले आयुष्य त्याने तिथेच व्यतीत केले. १९७० साली त्याचा मृत्य झाला.