ACHARYA ABHISHEK

सिनेमॅटोग्राफ- सुरुवात

शंभर वर्षांच्या या इतिहासात ज्या श्रेष्ठ चित्रपटकत्त्यांनी सिनेमाला कलेचे स्थान मिळवून दिले, त्यांच्याशी जान पहचान करून देणारी लेखमालिका...

पडद्यावर हलणाऱ्या चित्रांपासून आशयगर्भ चित्रचौकटींपर्यंतचा प्रवास चित्रपटकलेने केला आहे. शंभर वर्षांच्या या इतिहासात ज्या श्रेष्ठ चित्रपटकत्त्यांनी सिनेमाला कलेचे स्थान मिळवून दिले, त्यांच्याशी जान पहचान करून देणारी लेखमालिका…

स्थळ : सलोन इंडियन न्यू ग्रँड कॅफे, पॅरिस. डिसेंबर १८९५.

पॅरिसच्या एका आलिशान भागातील न्यू ग्रँड कॅफेच्या खास सजवलेल्या तळघरात फान्समधील उच्चभ्र, कलावंत आणि कलाप्रेमी मंडळी मोठ्या औत्सुक्याने जमलेली होती. कारणही तसेच महत्त्वाचे होते. त्या वेळेपर्यंत जगात कुठेही न दाखविली गेलेली प्रकाशाची जादू आज या माणसांना करून दाखविली जाणार होती. लुई आणि ऑगस्ट हे दोन ल्युमिए बंधू ‘पडद्यावर हलणाऱ्या चित्रांची’ ही जादू प्रेक्षकांना दाखविणार होते. ल्युमिए बंधंनी त्यांचे ते चमत्कारिक दिसणारे मशीन हॉलमध्ये आणन ठेवले. ‘सिनेमाटोग्राफ’ या नावाचे हे यंत्र म्हणजे समोर काचेचे भिंग असलेली पेटी होती. बाहेरच्या बाजूस असलेली मूठ फिरवताच समोरच्या भिंतीवर हलती, धावणारी माणसे दिसू लागली. अवघे ४६ सेकंद. पण तेवढ्यात आपण काहीतरी विलक्षण पाहिले, अशी थक्क करून टाकणारी भावना हॉलमधील प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली होती. पुढे जाऊन ‘चित्रपटकला’ म्हणून जी कला साऱ्या जगावर मोहिनी घालणार होती, त्या कलेचे हे पहिले रूपडे त्या दिवशी माणसाला दिसले. वेगवेगळ्या पद्धतीने माणसाला थक्क करून टाकण्याची या कलेची किमया अजून संपलेली नाही. ती चालूच राहणार आहे.

तर मी सांगत होतो या कलेच्या जन्माबद्दल…

सर्वसाधारणपणे चित्रपटकलेचा जन्म २९-१२- १८९५ ला झाला असे मानले जाते. वृक्षाचे रोप जमिनीतून वर आल्यावर त्याचा जन्म झाला, असे आपण म्हणतो. पण ही प्रक्रिया फार पूर्वीपासन चालू  झालेली असते. चित्रपटकलेचेही असेच   झाले. ल्युमिए बंधूंच्याही  पूर्वीपासन अनेक कल्पक व्यक्तींना या नव्या कलेची चाहूल लागली होती.  ऑक्टोबर १८८८ मध्ये यॉर्कशायर येथील लुई ले प्रिन्स याने फक्त दोन सेकंदाची हलती चित्रे असलेली फिल्म तयार   केली होती. तिला काही अभ्यासक अस्तित्वात असलेला सर्वात जुना चलचित्रपट मानतात. श्रेष्ठ वैज्ञानिक व संशोधक एडिसन यानेदेखील यासंदर्भात बरेच संशोधन केले होते. त्याने ‘कायनेटोग्राफ’ आणि ‘कायनेटोस्कोप’ अशी दोन यंत्रेही तयार केली होती. पण का कुणास ठाऊक, एडिसनने आपल्या या शोधांकडे फारशा गंभीरपणे पाहिले नाही. त्यांचा पाठपुरावा केला नाही. त्या शोधांचे पेटंटही त्याने घेतले नाही. ल्युमिए बंधूंपैकी ऑगस्टचा जन्म १८६२ साली व लुईचा जन्म १८६४ साली फान्समध्ये झाला. त्यांचे वडील फोटोग्राफिक फर्मचे मालक होते व हे दोघे बंधू त्यांना कामात मदत करीत. लुई फर्मची तांत्रिक बाजू सांभाळत असे, तर ऑगस्ट व्यवस्थापकीय बाजू पाही. लुई हा फार कल्पक तंत्रज्ञ होता. स्टिल फोटोग्राफीमधील ड्राय प्लेट प्रोसेस नावाची महत्त्वाची पद्धत त्यानेच शोधुन काढली होती. १८९२ मध्ये वडील निवृत्त झाल्यावर या दोघा बंधुनी चलचित्रपट तयार करण्याच्या प्रकल्पाला वाहून घेतले. ‘सिनेमॅटोग्राफ’ या नावाचे यंत्र तयार करून त्यांनी त्याचे पेटंट घेतले. १३ फेब्रुवारी १८९५ रोजी त्यांनी या यंत्राद्वारे आपल्या फॅक्टरीच्या दारात पहिले चल छायाचित्रण केले. हे दृश्य फॅक्टरीतन कामगार बाहेर पडतानाचे होते. २९ डिसेंबरच्या पहिल्यावहिल्या ‘शो’मध्ये ल्युमिए बंधूनी दहा चित्रपट दाखविले. अर्थात हे चित्रपट फारच लहान होते व कोणताही चित्रपट एक मिनिटात मोठा नव्हता.

ल्युमिए बंधूंनी दाखविलेले चित्रपट होते- वर्कर्स लीव्हिंग ल्युमिए फैक्टरी (४६ सेकंद), हॉर्स ट्रिक रायडर्स (४६ सेकंद), फिशिंग द गोल्डफिश (४२ सेकंद), डिश एम्बार्कमेंट (४८ सेकंद), ब्लॅकस्मिथ (४९ सेकंद), स्प्रिंकलर स्किल्ड (४९ सेकंद), बेबीज ‘ ब्रेकफास्ट (४१ सेकंद), जंपिंग ऑन टू  द ब्लँकेट (४१ सेकंद), अ स्ट्रीट सीन (४४ सेकंद), बाथिंग इन द सी (३८ सेकंद). गंमतीची गोष्ट म्हणजे पुढे चित्रपट ज्या काही महत्त्वाच्या दिशांनी विस्तारला, त्या वाटांवरली पहिली पावले कळत-नकळत या दिवशीच टाकली गेली. अनुबोधपट व सामाजिक आशय (वर्कर्स लीव्हिंग फॅक्टरी), कौटुयिक चित्रपट (बेबी ज् ब्रेकफास्ट), विनोदी चित्रपट (स्प्रिंकलर स्प्रिंकल्ड).

ल्यमिए बंधुंचा हा प्रयोग कल्पनेबाहेर यशस्वी झाला. तो इतका लोकप्रिय बनला की, आपली यंत्रसामुग्री घेऊन ते जगभर हे चित्रपट दाखविण्यासाठी हिंडले. ल्यूमिए बंधूंनी भारतातही ७ जुलै १८९६ रोजी हा खेळ केल्याची नोंद आहे. असे असले तरी आश्चर्याची गोष्ट म्हणजे या कलेच्या व्यावसायिक यशाविषयी व विकासाविषयी ल्युमिए बंधू साशंक होते.  या प्रयोगाला ‘ एन इन्व्हेन्शन विदाऊट एनी फ्यूचर’ असे त्यांनी स्वतःच म्हटले आहे. ही कला ज्यांनी निर्माण केली आणि निर्मितांना जे द्रष्टेपण दाखविले, त्यांना या कलेच्या विकासाच्या शक्यता का दिसल्या नाहीत, हे एक कोडेच आहे. ल्युमिए बंधूंनी चित्रपटनिर्मितीत फारसे लक्ष घातले नाही सिनेमाला भवितव्य नसल्याचा असा ‘विश्वास’ असल्यामुळे  नंतर ल्युमिए बंधूंनी चित्रपटनिर्मितीत फारसे लक्ष घातले नाही. ते मुळात कल्पक तंत्रज्ञ होते. पुढे त्यांनी रंगीत छायाचित्रणाचे तंत्र शोधून काढले, विकसित केले. पण नंतरही त्यांनी चित्रपटनिर्मितीत रस दाखविला नाही.