ACHARYA ABHISHEK

एरिक व्हॉन स्ट्रॉहेम

मूकपटांचे युग संपून बोलपटांचे युग निर्माण झाले त्याला आता ८० वर्षे लोटली. मात्र अजूनही मुकपटाची जमान्यातील जे चित्रपट शिळे झालेले नाहीत, ज्यांचा प्रभाव आज इतक्या वर्षांनंतर पाहतानाही जाणवतो व जे आजही अभ्यासले जातात, अशा मूकपटांत 'ग्रीड' या असामान्य चित्रपटाचा अंतर्भाव केला जातो.

मूकपटांचे युग संपून बोलपटांचे युग निर्माण झाले त्याला आता ८० वर्षे लोटली. मात्र अजूनही मुकपटाची जमान्यातील जे चित्रपट शिळे झालेले नाहीत, ज्यांचा प्रभाव आज इतक्या वर्षांनंतर पाहतानाही जाणवतो व जे आजही अभ्यासले जातात, अशा मूकपटांत ‘ग्रीड’ या असामान्य चित्रपटाचा अंतर्भाव केला जातो.

मूकपटांचे युग संपून बोलपटांचे युग निर्माण झाले त्याला आता ८० वर्षे लोटली. मात्र अजूनही मुकपटाची जमान्यातील जे चित्रपट शिळे झालेले नाहीत, ज्यांचा प्रभाव आज इतक्या वर्षांनंतर पाहतानाही जाणवतो व जे आजही अभ्यासले जातात, अशा मूकपटांत ‘ग्रीड’ या असामान्य चित्रपटाचा अंतर्भाव केला जातो. या चित्रपटाचा दिग्दर्शक एरिक व्हॉन स्ट्रॉहेम याचा जन्म १८८५ साली व्हिएन्ना येथे झाला. १९०९ साली तो अमेरिकेत वास्तव्यास आला व येथील चित्रपटसृष्टीने त्याचे लक्ष वेधून घेतले. त्याने डी. डब्ल्यू. ग्रिफिथच्या हाताखाली अप्रेंटिसशिप सुरू केली. ग्रिफिथच्या ‘बर्थ ऑफ ए नेशन’मध्ये त्याने अभिनयही केला, असे त्याचे म्हणणे आहे. ग्रिफिथसारख्या असामान्य व कल्पक दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनाखाली पहिले धडे घेतल्यामुळे एरिकला या माध्यमाची जवळुन ओळख झाली. स्वतंत्र दिग्दर्शन करण्याची संधी त्याला ‘ब्लाइंड हजबंड’ (१९१९) या चित्रपटाद्वारे मिळाली. त्याने दिग्दर्शित केलेला ‘ग्रीड’ (१९२४) हा चित्रपट प्रचंड गाजला. पडद्यामागे व पडद्यावरही! शूटिंग करण्याच्या त्याच्या आगळ्या-वेगळ्या पद्धतीमुळे त्याचे निर्मात्यांशी व कलाकारांशी कधीच पटले नाही. ‘ग्रीड’ नंतर त्याने ‘हनीमुन’ (१९२८), ‘क्वीन केली’ (१९२९) व ‘हॅलो सिस्टर’ (१९३३) असे काही चित्रपट दिग्दर्शित केले. पण नंतर कंटाळन त्याने अमेरिका सोडली व १९३६ साली तो फान्समध्ये राहावयास गेला. उरलेल्या आयुष्यात त्याने काही चित्रपटांत किरकोळ भूमिका केल्या, एवढेच. १९५७ साली त्याचा मृत्यू झाला. मृत्युसमयी जवळ असलेल्या वार्ताहराला तो म्हणाला, ‘मृत्यु येणे वाईट नाही. वाईट हे की, त्याने माझ्या आयुष्यातली २५ वर्ष बरबाद केली!’

हॉलीवूडबद्दल त्याचे मत नेहमीच वाईट राहिले. तो म्हणे, ‘फान्समध्ये तुम्ही ५० वर्षांपूर्वी एक उत्तम चित्रपट निर्माण केला असेल तर आजही तुमचे नाव आदराने घेतले जाते. हॉलीवूडमध्ये एका सिनेमानंतर तीन महिने तुम्ही गप्प बसलात की लगेच विसरले जाते.’

‘ग्रीड’ या चित्रपटाची कथा फ्रॅंक नॉरिस या अमेरिकन कादंबरीकाराच्या ‘मॅक्टिग’ या कादंबरीतून घेतली आहे. आधुनिक अमेरिकन कादंबरीच्या इतिहासात ‘रक्तरंजित वास्तववादा’ चा एक पुरस्कर्ता म्हणून नॉरिसचे नाव घेतले जाते. १८७० साली शिकागो येथे फँकचा जन्म झाला. १७ वर्षांचा असतानाच तो कलाशिक्षणासाठी पेरीस गेला. त्यानंतर दक्षिण आफिकेतील बोअर युद्धात त्याने भाग घेतला. सॅनफ्रान्सिस्कोमध्ये असताना त्याने तेथील तळागाळातील लोकांच्या जीवनाचे बारकाईने निरीक्षण केले होते. वयाच्या केवळ १९ व्या वर्षी त्याची ‘मॅक्टिग’ ही कादंबरी प्रकाशित झाली. या कादंबरीतील जीवनदर्शन, आवाका आणि लेखकाची जाण केवळ अपूर्व होती. सॅनफान्सिस्कोमधील बकाल वस्त्या, लहान दुकाने, हॉटेले, वेश्यागृहे, तेथील माणसे यांचे जिवंत चित्रण त्याने या कादंबरीत केले आहे. लोभ माणसाचे जीवन कसे उद्ध्वस्त करून टाकतो, हे या कादंबरीचे मध्यवर्ती सूत्र असले, तरी आदिम प्रेरणा माणसाला कशा झपाटन टाकतात, हेही त्याने प्रभावीपणे मांडले आहे. १९ व्या शतकातील श्रेष्ठ अमेरिकन कादंबऱ्यांत या कलाकृतीची गणना होते. यानंतर त्याने ‘ऑक्टोपस’, ‘द पिट’ या दोन कादंबऱ्या लिहिल्या. मात्र, वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी त्याचा आकस्मिक मृत्यू झाल्यामुळे त्याच्या मनातले अनेक संकल्प अर्धवटच राहून गेले.